१३) गुरूजी छड़ी नका मारु
गुरूजी छड़ी नका मारु जी नि लगाते हातावारी-२
शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरूजी
गुरूजी छड़ी....।।1।।
आवंदाच ग वारिस बाई मी
सहाव गाठलं ग
शिकन्यासाठी पहिलं पाऊल
शाळेत मी टाकलं ग
येतंय रडू मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
गुरूजी छड़ी.....।।2।।
शब्द वाचता वाचता माझी
मान दुखू लागलीं ग
अंक लिहिता लिहिता माझी
बोटं दुखू लागलीं ग
उलटे अक्षर काढले जरी
अरसा त्याला सुलटे करी गुरूजी छड़ी....।।3।।