१२) गंपुने केले साबणाचे फुगे
गंपुने केले साबणाचे फुगे
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे
एक फुगा अहा एक फुगा -2
एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला
गंपुला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।1।।
एक फुगा आजीच्या हातावर बसला
गंपुला तो लाडुच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।2।।
एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंपुला तो मोतीच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।3।।
एक फुगा आईच्या गालावर बसला
गंपुला तो पापाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।4।।