जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
१४) शाळा प्रवेश गीत
( चाल - मामाच्या गावाला जाऊया) 

शिक्षणगंगा दारात येई
चल रे दादा, चल गं ताई
प्रगतीची आस धरूया
शाळेत सहभागी होऊया || धृ ||

मोफत शिक्षण, जाणिवपुर्वक सर्वेक्षण
६ ते १४ वय पाहून, दाखल यादीचे जतन,
प्रवेश ऊत्सव घेऊया, शाळेत सहभागी होऊया || १ ||

सुसज्ज शाळा ईमारत, नवागतांचे स्वागत
गणवेशाची रंगत, पाठ्यपुस्तक मोफत,
उपस्थिती पुर्ण ठेऊया, शाळेत सहभागी होऊया || २ ||
                                                 
भौतिक सुविधा जाणिव, भरून काढुया उणीव
शैक्षणिक उठाव भरून, भविष्यासाठी श्रमदान
निर्मळ गाणी गाऊया, शाळेत सहभागी होऊया || ३ ||

विशेष गरजा मदत, गरिब गरजू दत्तक
आरोग्याचे दक्षक, स्वच्छतेचे रक्षक
सशक्त भारत घडवूया, शाळेत सहभागी होऊया || ४ ||

भाषा गणित बुध्दिमत्ता, अखंड ठेऊ गुणवत्ता
ईलर्निंगची साथ आता, अज्ञान होईल बेपत्ता
विज्ञान प्रदर्शन भरवूया, शाळेत सहभागी होऊया || ५ ||

सर्वांगाने घडवू मुले, समस्यांची होतील फुले
ग्रामस्थांची साथ मिळे, प्रगतीचे हे गणित जुळे
शिक्षण हक्क मिळवुया, शाळेत सहभागी होऊया || ६ ||

कवी -
संजय वसंत जगताप