जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
शिक्षण आमचा हक्क आहे

शिक्षण आमुचा हक्क आहे, आम्ही तो बजावणार
रोज शाळेत जाऊन आम्ही खूप खूप शिकणार 
खूप मित्र, मैत्रिणी मज्जाच मज्जा येणार
अभ्यास, खेळ, नाच, गाणे यात आम्ही रमणार

परीक्षेचा ताण नाही, सहज शिकत राहणार
आनंदाने पुढच्या वर्गात नक्कीच आम्ही जाणार
वाचन, लेखन, गणिताबरोबर गाणी आम्ही म्हणणर
सुंदर सुंदर चित्रे काढून त्यात रंगही भरणार

अपंग, अंध, विकालांगांना मदत आम्ही करणार
सारे मिळून अभ्यास करून मोठे आम्ही होणार
जात, धर्म नि पंथ वेगळे, तरीही एक होणार
भिन्न संस्कृती आणिक भाषा सारे आम्ही शिकणार 

सातत्याने अभ्यासात आम्ही पुढे जाणार
हक्क आमुचा शिकण्याचा पूर्णत्वाला नेणार
स्वप्न आमुच्या प्रगतीचे सत्यामध्ये येणार
भारतमातेला यशाच्या शिखरावरती नेणार