रिम झिम रिम झिम
रिम-झिम, रिम-झिम, रिम-झिम, रिम-झिम ||
पडतो आहे पाऊस माझ्या लाडाचा |
खेळगडी हा बालपणीचा अंगणातल्या झाडाचा || रिम-झिम...||धृ||
कौलारांवर ठेका धरुनी,
टपटप तबला वाजवितो |
वाऱ्यावरती असा झुले की
झोपाळ्याला लाजवितो || रिम-झिम...||१||
हिरव्या-हिरव्या कुरणावरती,
नाचत पाऊल टाकतसे |
तळ्यात आपुले रूप पहाया,
आभाळातून वाकतसे || रिम-झिम...||२||
मोर पिसापरी नाजूकशी सर,
गालावरुनी फिरवितसे |
मेघांच्या पालखीत बसूनी,
पाऊस राजा मिरवितसे || रिम-झिम...||३||