आली आली पारू शाळेला
आली आली आली पारू शाळेला
शिक्षणाचा शुभारंभ झाला
अज्ञानावर प्रहार हा पहिला
आली आली आली पारू शाळेला
बाई गुरुजीच्या मुखी मायेचा झरा
लाजरी बुजरी पारू लागली बोलू तरतरा
ओढ शाळेची लागली मनाला
आली आली आली पारू शाळेला
बाई गुरुजीच्या मुखी मायेचा झरा
लाजरी बुजरी पारू लागली बोलू तरतरा
ओढ शाळेची लागली मनाला
केले दंडवत विद्या आराधनेला
आली आली पारू शाळेला
खेळ गाणी गोष्टीमुळे सरली भीती
क्षमतांच्या सागरात डुंबली किती
निसर्ग सारा तिचा मित्र झाला
आली आली पारू शाळेला
खेळ गाणी गोष्टीमुळे सरली भीती
क्षमतांच्या सागरात डुंबली किती
निसर्ग सारा तिचा मित्र झाला
केले आपलेसे वाऱ्या पावसाला
आली आली पारू शाळेला
मूल्य शिक्षणाचे बीज मनी रुजले
बाल फुल शाळेमध्ये फुलू लागले
हक्क आपुला तिला हा मिळाला
आली आली पारू शाळेला
मूल्य शिक्षणाचे बीज मनी रुजले
बाल फुल शाळेमध्ये फुलू लागले
हक्क आपुला तिला हा मिळाला
नाही डरनार ती अन्यायाला
आली आली आली पारू शाळेला
झुगारील पारू आधाराच्या कुबड्या
विकासाच्या प्रवाहात घेउनी उड्या
तोंड देईल भयाण वादळाला
आली आली आली पारू शाळेला
झुगारील पारू आधाराच्या कुबड्या
विकासाच्या प्रवाहात घेउनी उड्या
तोंड देईल भयाण वादळाला
नाव नेईल सुखाने तटाला
आली आली आली पारू शाळेला