जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
हिमालयाशी सांगती नाते

हिमालयाशी सांगती नाते सह्यागिरीचे कडे 
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे ||धृ||

दगडांचा हा देश छाती दगडाची याची 
अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबांची 
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||१||

गडागडावर कड्याकड्यावर इतिहासाच्या खुणा 
मनामनावर मंत्र घालुनि देत नव्या प्रेरणा 
मान रक्षिण्या इथे शिंपले रक्ताचे किती सडे 
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||२||

संताचा हा देश, सोयरा पीडित दुखीतांचा 
वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दीनांचा 
तळपत राहील सदैव जोवर चंद्र सूर्य हे खडे 
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||३||