१०) अंगणात माझ्या मोरियो आला..
अंगणात माझ्या मोरियो आला-२
मोर म्हणून बोलावितो..2
मोरियो घुंगरू वजवितो...2
हातातले कंगन दे मला आई
कंगन म्हणून बोलावितो
मोरियो....।।1।।
नाकातली नथनी दे मला आई
नथनी म्हणून बोलावितो
मोरियो...।।2।।
पायातली पैंजन दे मला आई
पैंजन म्हणून बोलावितो
मोरियो...।।3।।
कानातली बुगड़ी दे मला आई
बुगड़ी म्हणून बोलावितो
मोरियो...।।4।।
मोरियो घुंगरू वजवितो.....