जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769

करितो प्रार्थना हे दाता तुज

करितो प्रार्थना हे दाता तुज, मंगलता ही लाभो
ज्ञान कणांनी वर्षुनी आम्हा विनम्रता ही लाभो ||धृ||

दे बुद्धी दे, दे शक्ती दे, दे आशीष दे तू सर्वांना
दे युक्ती दे, दे भक्ती दे, घे चरणी घे तू सर्वांना
विनंती करितो, हे दाता तुज, कोमलता ही लाभो ||१||

दे सद्बुद्धी, दे समृद्धी, ने प्रगतीस्तव तू सर्वांना
विश्वबंधुता विश्वएकता, दे ही भावना तू सर्वांना
करितो कामना हे दाता तुज. विश्वशांतता ही लाभो ||२||