नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
शब्दरूप शक्ति दे, भावरूप भक्ती दे
शब्दरूप शक्ति दे, भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा, चिमणपाखरा
ज्ञान मंदिरा…
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
विद्याधन दे आम्हांस, एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा, दयासागरा
ज्ञान मंदिरा…
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा
ज्ञान मंदिरा…
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा