जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम
⏺ 25 निकष⏺

1)निकष क्रमांक 01➖ आपल्या शाळेत कोणत्याही वर्गातील मुले 100%पट व उपस्थिती टिकवणे.

2)निकष क्रमांक 02➖ शाळा बाह्य बालके, प्रत्यक्ष प्रवेशित बालके.

3)निकष क्रमांक 03➖ परिसर स्वच्छता

4)निकष क्रमांक 04➖ रचनावादी साहित्य प्रत्येक विषयासाठी किमान दहा घटकांच्या अध्यापनासाठी साहित्य असल्यास (20प्रकारचे शिक्षकांनी स्वयंनिर्मिती साहित्य असल्यास)

5)निकष क्रमांक 05➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान पाच गणितीय संख्या अचूक लिहिता येणॆ.
इयत्ता १ली,२री साठी एक व दोन अंकी संख्या अचूक लिहीता -वाचता येणॆ
इयत्ता ३री साठी तीन अंका पर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
इयत्ता ४थी साठी पाच संख्या वाचन लेखन
इयत्ता ५तें ८साठी सात अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन लेखन करता येणॆ

6)निकष क्रमांक 06➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास किमान इयत्ता नुसार शैक्षणिक साहित्याचा वापर करून पाच बेरीजेची उदाहरणे सोडविता येणॆ.

7)निकष क्रमांक 07➖ कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास किमान इयत्तेनुसार शैक्षणिक साहित्याचा वापर करून  पाच वजाबाकीची उदाहरणे सोडविता येणॆ.

8)निकष क्रमांक 08➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ईयत्तानुरुप शैक्षणिक साहित्याच्या सहाय्य्याने किमान एक गुणाकार अचूक करता येणॆ.

9)निकष क्रमांक 09➖ कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने अचूक भागाकार करता येणॆ.

10)निकष क्रमांक 10➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वजन, मापे, आकारमान, लांबी, वेळ सांगता येणे आणि त्यावर आधारित गणिताची शाब्दिक उदाहरणे सोडवता येणॆ

11)निकष क्रमांक 11➖ कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल आशयातील पाच वाक्ये वाचन करता येणॆ.

12)निकष क्रमांक 12➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल आशयातील पाच वाक्ये श्रुतलेखन लिहिता येणॆ.

13)निकष क्रमांक 13➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल आशयाच्या आकलनावर आधारित विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे देता येणॆ.

14)निकष क्रमांक 14➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरापासून तयार होत जाणारे आणखी एक एक असे पाठ्यपुस्तकाबाहेरील पाच शब्द तयार करता येणॆ.

15)निकष क्रमांक 15➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता वैयक्तिक साभिनयासह करता येणॆ.

16)निकष क्रमांक 16➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास आशयाला अनुसरून चित्रवाचन करता येणॆ.

17)निकष क्रमांक 17➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास कोणतेही तीन शब्द देऊनत्यावर पाच वाक्ये तयार करता येणॆ.

18)निकष क्रमांक 18➖ कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलाच्या चेहऱ्यावर बोलण्यात, उत्तरे देण्यात, प्रतिसाद आणि वर्तनात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.

19)निकष क्रमांक 19➖ कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास कोणतेही तीन शब्द देऊन त्यावर गोष्ट तयार करता येणॆ.

20)निकष क्रमांक 20➖ कोणत्याही वर्गात कोणत्याही विद्यार्थ्यास नाटिका 3 ते 5 मिनिटे सादर करता येणॆ.

21)निकष क्रमांक 21➖ कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास घड्याळातील काटे फिरवून अचूक वेळ दाखवता येणॆ.

22)निकष क्रमांक 22➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास कोणतेही 3 शब्द देऊन त्यावर कविता तयार करता येणॆ.

23)निकष क्रमांक 23➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास त्या वर्गातील आशयानुसार सामान्य ज्ञानावार आधारित इंग्रजीत विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे देता येणॆ.

24)निकष क्रमांक 24➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणॆ.

25)निकष क्रमांक 25➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास उभे राहून वर्गानुकूल दिलेल्या विषयावर 4 तें 5 वाक्यात विचार मांडता येणे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖