दिनविशेष
२३ एप्रिल
२३ एप्रिल
जागतिक पुस्तक दिन
महत्त्वाच्या घटना
१६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
१८१८: इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.
१९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
२००५: मी अॅट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.
जन्म
१७९१: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८६८)
१८५८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९४७)
१८५८: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
१८७३: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९४४)
१८९७: नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे १४ वे पंतप्रधान लेस्टर बी. पिअर्सन यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)
१९३८: शास्त्रीय गायिका एस. जानकी यांचा जन्म.
१९७७: भारतीय-अमेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म.
मृत्यू
१६१६: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १५६४)
१८५०: काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १७७०)
१९२६: ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ हेन्री बी. गुप्पी यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १८५४)
१९५८: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८७१)
१९६८: पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९०२)
१९८६: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)
१९९२: ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२१)
१९९७: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचे निधन. (जन्म: २३ मे १९१८)
२०००: ४० वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे बाबासाहेब भोपटकर यांचे निधन.
२००१: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती जयंतराव टिळक यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२१)
२००७: रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)
२०१३: पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९१९)