जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
   दिनविशेष   
३१ जानेवारी


महत्त्वाच्या घटना
१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.
१९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
१९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.
१९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
१९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.
१९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.

जन्म
१८९६: कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१)
१९३१: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००८)
१९७५: चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.

मृत्यू

१९५४: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८९०)
१९६९: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ – पुणे, महाराष्ट्र)
१९७२: नेपाळचे राजे महेन्द्र यांचे निधन.
१९८६: संगीतकार विश्वनाथ मोरे यांचे निधन.
१९९४: मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन.
१९९५: बँकिंग तज्ञ, रोखे बाजार नियामक मंडळाचे (SEBI) चे अध्यक्ष सुरेश शंकर नाडकर्णी यांचे निधन.
२०००: नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन. (जन्म: २० मार्च १९२०)
२०००: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९०८ – डेहराडून, उत्तराखंड)
२००४: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)
२००४: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचे निधन. (जन्म: १५ जून १९२९)